महाराष्ट्र

मदर्स रेसिपीच्या संजना देसाई यांची लक्षवेधी कामगिरी; पूना क्लब फिटनेस लीग 2023 मध्ये शक्तिशाली वेटलिफ्टर म्हणून बाजी

Spread the love

Pune: सामर्थ्य आणि महत्त्वाकांक्षेचं उल्लेखनीय प्रदर्शन घडवत मदर्स रेसिपीच्या कार्यकारी संचालिका संजना देसाई यांनी पूना क्लब फिटनेस लीग 2023 मध्ये स्त्री-पुरुषांच्या वजनी गटात सर्वाधिक शक्तिशाली वेटलिफ्टर/भारोत्तोलक म्हणून आपले स्थान निश्चित केले. त्यांनी आपल्या खेळाचे प्रदर्शन करताना 304 विल्क्स स्कोअरची लक्षणीय कमाई केल्याने त्या मानकरी ठरल्या, इतकेच नव्हे तर उपस्थित सर्व पुरूष स्पर्धकांमध्ये संजना देसाई यांची कामगिरी उजवी ठरली. या खेळात विविध वजनी गट लिंगनिहाय स्वरुपात सहभागी होतात, हे दोन्ही निकष आणि भारोत्तोलकाने उचललेले वजन यावरून विल्क्स स्कोअर ठरत असतो. त्यांनी स्वत:च्या मर्यादा ओलांडत, प्रभावी विल्क्स स्कोअरसह नवीन वैयक्तिक विक्रम प्रस्थापित केले. त्यांची कामगिरी सर्व लिंगाच्या वजनी गटांत सरस ठरली, हे विशेष! संजना देसाई यांचा थक्क करणारा विजय कोणताही अडथळा पार करण्याची त्यांनी जपलेली बांधिलकी आणि तंदुरुस्तीप्रती समर्पण दर्शवते. त्यांची ही कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी तर आहेच, शिवाय शारीरिक शक्तीला लिंगमर्यादा बांधून ठेवू शकत नाही, हे त्यातून सिद्ध होते. संजना यांनी केवळ वजनांवरच विजयश्री मिळवलेली नाही तर उत्कटता आणि चिकाटीच्या सामर्थ्याचे उदाहरण देत साचेबद्ध विचार मोडून काढले आहेत.

“कंपनीच्या मिशनकरिता माझे योगदान व्यवसायापलीकडचे आहे; त्यामागे खूप मोठा उद्देश आहे. माझी वैयक्तिक जीवनातील उद्दिष्टे कंपनीच्या ध्येयाशी अखंडपणे गुंतलेली आहेत. माझ्यादृष्टीने फिटनेस हे समर्पण, शिस्त आणि सातत्य यांचे प्रतीक आहे. व्यावसायिक जग आणि तंदुरुस्तीच्या क्षेत्रात, स्त्रियांना अनेकदा सामर्थ्याच्या मर्यादांचे अडथळे जाणवतात. मला त्या मर्यादांना आव्हान द्यायचे आहे आणि ‘मी करू शकते, ती करू शकते’ विधान अधोरेखित करावेसे वाटते”, असे मदर्स रेसिपीच्या कार्यकारी संचालिका, संजना देसाई म्हणाल्या.

अवघ्या दोन वर्षांपूर्वी, संजना देसाई यांनी विशाल सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ब्रिक हाऊस, पुण्यातील व्हायब्रंट परफॉर्मन्स जिममध्ये सामर्थ्यशाली प्रशिक्षण प्रवासाची सुरुवात केली. या परिवर्तनशील अनुभवाने शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्य यांच्यातील गहन दुवा ठळक केला. संजना यांच्यासाठी, स्वत:च्या प्रशिक्षकाप्रती दाखवलेली सहयोगी भावना, मदर्स रेसिपीच्या व्यवसायातील संस्कृतीचे प्रतिबिंब आहे – टीमवर्क, समर्थन आणि सामायिक यशाचे ते द्योतक आहे. जिथे वैयक्तिक आणि व्यावसायिक वृद्धी परस्पर साथीने भरभराट करतात.

फूड इंडस्ट्रीमध्ये अग्रगण्य असलेल्या संजना देसाई यांचे यश हे आरोग्यदायी जीवनशैलीत समतोलाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. त्यांची यशोगाथा नेतृत्व, दृढ निश्चय आणि कल्याणकारी वचनबद्धता आजही टिकून असल्याचे सांगते. स्त्री-पुरूष समान असल्याचे हे ठोस उदाहरण म्हणता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×