पिंपरी चिंचवडराजकिय

महेशदादांच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ, उद्या घटस्थापणेच्या मुहूर्तावर शपथविधी शक्य

आता अजित पवारांचा अश्वमेध रोखण्यासाठी भाजपाची शिकस्त

Spread the love
14-10-2023

पिंपरी :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना भाजपाने सत्तेत घेतले पण आता अजित पवार भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी होवू लागले आहेत. कोणीतरी यांना रोखा रे असा टाहो भाजपावाले फोडू लागले आहेत. यामुळे अजित पवार यांचा अश्वमेध रोखण्यासाठी भाजपाने ही जबाबदारी भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्यावर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

आ. महेश लांडगे यांना मंत्रीपद मिळेल अशी गेली काही वर्षे चर्चा चालू आहे पण या ना त्या कारणामुळे त्यांच्या मंत्रीपदला हुलकावणी मिळत आहे. पण संकटग्रस्त भाजपाला संकटमोचन म्हणुन महेशदादांची आठवण आली असून त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे समजते.
महेश लांडगे यांच्या मंत्रीपदा साठी कदाचीत अद्या रविवार दिनांक 15 आक्टोबर हाच घटस्थापणेचा मुहूर्त साधला जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

अजित पवार हे भाजपाला सरकारचे तीसरे इंजीन वाटत होते. परंतू हे तीसरे इंजीन भाजपाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावू लागले आहे त्यामुळे राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांची फरफट होवू लागली आहे. आता अजित पारांना दुर करता येत नाही परंतू  त्यांना काही अंशी रोखता येईला का यांची चाचपणी पक्षाने केली. यात अजित पवारांना केवह भोसरीचे आमदार महेश लांडगे हेच रोखू शकतात यावर वरिष्ठ पातळीवर एकमत झाले असून त्यासाठी महेश लांडगे यांना ताकद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याचबरोबर अगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेवून शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपा महेश लांडगे यांना लोकसीेसाठी मैदानात उतरविण्याची शक्याता असून त्यासाठीही महेश लांडगे यांना आत्ता मंत्रीपद दिल्यास त्याचा त्यांना उपयोग होवू शकतो या सर्व समिकरणांवर महेशदादा कदचीत उद्याच मंत्रीपद प्राप्त करु भंडारा उधळतील असे बोलले जात आहे. भाजपाची अजित पवारांना रोखण्याची शिकस्त आता महेशदादा लांडगे करतील का हे पहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या
नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये नदी सुरक्षा दलाची निर्मिती होणार
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे विचार व वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे-मंत्री आदिती तटकरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×