गुन्हेगारीपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

सात महिन्याच्या गरोदर महिलेचे नरबळीसाठी अपहरण?

आज सर्वपित्रीच्या दिवशी होणार का नरबळी? शहरवासियांमध्ये खळबळ

Spread the love

गेली दोन दिवस पती फोडतो टाहो; पोलिसांना मात्र नाही गांभिर्य


संत तुकाराम नगर – गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयातून एका सात महिन्याच्या गरोदर महिलेचे संमोहन करून अपहरण करण्यात आले आहे. काही बंगाली जादूटोना करणार्‍या व्यक्तींनी आपल्या पत्नीचे अपहरण करून सर्व पित्री आमवस्येच्या दिवशी तीचा बळी देणार असल्याचा आरोप तीच्या पतीकडून करण्यात येत आहे. गेली दोन दिवस पोलिसांनी तातडीने हालचाल करून आपल्या पत्नीला वाचवावे यासाठी तो बिचार पोलिस चौकीच्या दारात टाहो फोडताना दिसत आहे. परंतू पोलिसांकडून मात्र ही गोष्ट अद्याप गांभिर्याने घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब परिसरात सर्वत्र पसरली असून आज या महिलेचा बळी जाणार कां? यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी सदर महिलेचा काही बंगाली जादूटोना करणार्‍या व्यक्तींशी संपर्क आला. सदर महिलेला पहिल्या दोन मुली असून ती आता तीसर्‍यांदा गरोदर आहे. यावेळी तरी मुलगा व्हावा या उद्देशाने काहींच्या सांगण्यावरून ही महिला जादूटोना करणारांना भेटली. त्यावेळी या व्यक्तींनी पोटात असलेले बाळही मुलगीच आहे. असे ठाम पणे सांगितले. त्याच बरोबर आपण जादूटोनाच्या मदतीने सदर मुलीचे गर्भातच मुलामध्ये रूपांतरण करण्याचा विश्‍वासही या व्यक्तींनी सदर महिलेला दिला.

मुलाच्या अपेक्षेने ही महिलाही या बंगाली जादूटोना करणारांकडे आकर्षित होऊ लागली. एके दिवशी तीने सारा प्रकार आपल्या पतीच्या कानावर घातली. त्यावेळी पतीने हे सर्व थोटांड आहे. त्यावर विश्‍वास ठेऊ नको. तसेच पुन्हा या बंगाली लोकांकडे जाऊ नको असा स्पष्ट सल्ला दिला. ही गोष्ट बंगाली लोकांना कळाल्यानंतर त्यांनी पती घरी नसताना महिलेची भेट घेऊन तीला पुन्हा गळी पाडले. हळूहळू या महिलेवर संमोहनाचा प्रयोग करून पतीला अंधारात ठेऊन आपण हे सर्व करू असा विश्‍वासही देण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी ही महिला नियमित तपासणीसाठी वाय सी एम रूग्णालयात आली खरी परंतू तेथून ती बेपत्ता झाली. या बंगाली जादूगारांच्या संमोहनाला बळी पडून आपली पत्नी त्यांच्या बरोबर पश्‍चिम बंगालला गेल्याचा आरोप तीच्या पतीने केला आहे. याबाबत त्याने पोलिस चौकीशी संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांमध्ये सर्व पित्री अमवस्या असून काळी जादू करणारी मंडळी या दिवशी गर्भवती महिलेचा नरबळी देतात आणि काही सिद्धी प्राप्त करतात असे आपल्या ऐकण्यात आले असून त्यासाठीच आपल्या पत्नीचे अपहरण झाले असल्याचे त्याचे वारंवार पोलिस यंत्रणेला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी या गोष्टीला थोडेही गांभिर्याने घेतलेले नाही. पोलिस चौकीच्या दारात बसून टाहो फोडणार्‍या या पतीची वक्तव्य नागरीकांनीही ऐकली आणि वार्‍यासारखी ही वार्ता परिसरात पसरली. काही पत्रकारांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यानंतर या पतीची तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते. परंतू परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून ज्या गतीने हालचाली होणे अपेक्षित आहे. त्या गतीने कामकाज होत नसल्याचेही दिसत आहे.

या महिलेच्या अपहरणाचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी वाय सी एम रूग्णालयाचे सी.सी. टी.व्ही. फुटेज तपासले. पहिल्या फुटेजमध्ये सदर महिला वॅगन आर गाडीत बसून गेल्याचे दिसून आले. परंतू फुटेजमध्ये स्पष्ट असे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी वाय.सी.एम. रूग्णालयाबाहेरील निवास व व्यवसायीकांकडील सी.सी. टी.व्ही. फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले की, खाजगी लोकांनी केवळ शो पीस म्हणुन सी.सी. टी.व्ही. लावले आहेत. यातील कोणताच सुरू नाही. एकाच ठिकाणी सी.सी. टी.व्ही. सुरू होता. तेथील फुटेज तपासल्यानंतर जवळपास आठ वॅगन आर गाड्या त्यावेळी गेल्याचे दिसून आले. त्यापैकी नेमकी कोणती गाडी तपासावयाची हा प्रश्‍न निर्माण झाला.

पोलिसांनी पुन्हा वाय.सी.एम. रूग्णालयाला भेट दिली. येथील मेन गेटवर असलेल्या सी.सी. टी.व्ही. फुटेज तपासण्याची परवानी मिळाल्याने ते तपासण्यात आले. त्यावेळी वॅगन आर गाडीच्या मागे एक रिक्षा उभी होती. त्यामध्ये बसून ही महिला गेल्याचे दिसून आले. सदर रिक्षा क्रमांकावरून पोलिसांनी रिक्षा चालकाची माहिती व फोन नंबर मिळविला आणि त्याच फोन करून पोलिस चौकीत हजर होण्याचे आदेश दिले. परंतू त्यानंतर सदरचा फोन बंद करून सदर रिक्षा चालक बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले.

या एवढ्याच तपासात दोन दिवस लोटले असून आज सर्व पित्री अमवस्येचा दिवस उजाडला आहे. त्यामुळे आज आपल्या पत्नीचा नरबळी दिला जाणार यावर पतीचा ठाम विश्‍वास असून पोलिसांनी काही तरी करावे अशी अपेक्षा तो येणारा-जाणाराकडे व्यक्त करीत आहे. पतीच्या सांगण्यानुसार, ही गोष्ट खरी असेल तर खरोखरच सदर गर्भवती महिलेचा आज बळी जाणार कांय? यावर जनसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सदर महिले बद्दल नागरीकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता पोलिस तपासात या महिलेचा खरच शोध लागणार कांय? याची वाट सर्वच जण पहात आहेत.

सी.सी. टी.व्ही. नव्हे शो पीस
या गुन्हाच्या शोधात असलेल्या पोलिसांनी परिसरात अनेक खाजगी मालमत्तांवरील सी.सी. टी.व्ही. फुटेज् तपासण्याचा प्रयत्न केला. परंतू जवळपास सर्वांचे सी.सी. टी.व्ही. बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ शो पीस किंवा लोकांना दाखविण्यासाठीच सी.सी. टी.व्ही. लावण्यात आले असल्याचे दिसून आले. अशा प्रकारे केवळ शो पीस म्हणुन सी.सी. टीव्ही लावणारांनी किमान आपल्या यंत्रणेमुळे कोणात्यातरी मोठ्या गुन्हाच्या शोधाला आणि निष्पापांचा बळी जाण्यापासून वाचविण्यास मदत होईल याचे भान ठेऊन सी.सी. टीव्ही सुरू ठेवावेत अशी अपेक्षा आहे. अशा सी.सी. टीव्ही बंद ठेवणारांनाही पोलिस आणि शासकिय यंत्रणेने कोठेतरी सक्ती करणे आवश्यक आहे असेच वाटते.

महत्वाच्या बातम्या
एकनाथदादा पवार करणार सीमोल्लंघन, 25 ऑक्टोबरला बांधणार शिवबंधन
महेशदादांच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ, उद्या घटस्थापणेच्या मुहूर्तावर शपथविधी शक्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×