पिंपरी चिंचवडराजकिय

प्रियांका बारसेंच्या पोस्टमुळे भोसरीत खळबळ

आ. महेश दादा लांडगे यांना टार्गेट केल्याची चर्चा

Spread the love
भोसरीतील नगरसेविका प्रियांका प्रवीण बारसे यांनी दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकली मात्र या पोस्टमुळे भोसरी परिसरातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. ही पोस्ट म्हणजे प्रियांका बारसे यांनी भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांना टारगेट केले आहे असे भोसरी परिसरात बोलले जात आहे.
प्रियंका बारसे या पोस्टमध्ये म्हणतात, दुसऱ्याच्या भरवशावर स्वतःचं आयुष्य घडविण्याचे स्वप्न पाहणं हे व्हेंटिलेटर वर जगण्यासारखे आहे. नाकात टाकलेल्या पाईप मधून ऑक्सिजन भेटला तर ठीक, नाहीतर मृत्यू अटळ आहे. प्रियांका बारसे यांनी ही पोस्ट भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांना डोळ्यासमोर ठेवून टाकली असल्याची चर्चा परिसरात चालू आहे.
गेल्या काही दिवसात भोसरीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजू लागली आहे. एका नगरसेविकेच्या पतीने एका बांधकाम व्यवसायिकाला मारहाण केल्यानंतर त्या बांधकाम व्यवसायिकाचे सर्व समाज बांधव आमदार महेश दादा लांडगे यांना भेटले होते. त्यानंतर महेश दादा लांडगे यांना त्या संपूर्ण समाजाची दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. त्यानंतर भोसरीच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. प्रियांका बारसे यांची ही पोस्ट त्याचेच प्रतीक असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे भोसरी भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व अलबेल आहे असे दाखवण्याचा प्रयत्न असताना प्रियंका बारसे यांच्या या पोस्टमुळे भोसरीतील धुसपुसही आता चव्हाट्यावर येऊ लागले आहे.
महत्वाच्या बातम्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×