पिंपरी चिंचवडव्हिडिओ

चिखलीमध्ये पूजेच्या साहित्याच्या दुकानाला लागली भीषण आग

Spread the love
पिंपरी चिंचवड शहरातील चिखलीमध्ये गुरुवारी (30 नोव्हेंबर) दुपारी दीडच्या सुमारास रिव्हर रेसिडन्सी चौकात पूजेच्या साहित्याच्या दुकानांना भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. शेजारी असलेल मेन्स पार्लर दुकान सुद्धा या आगीत जळून खाक झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
आग लागल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकडून दोन अग्नीशामक दलाच्या गाड्या तेथे उपस्थित झाल्या आणि आग विझवण्यास मदत झाली. आग नेमकी कशाने लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
https://youtu.be/_nS0yiUwDxM?si=8QYULISa23V2Vzci
महत्वाच्या बातम्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×