पिंपरी चिंचवडपुणे

तळवडे एमआयडीसीतील गोदामाला आग, सहा महिला कामगारांचा मृत्यू

Spread the love

तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. ही घटना आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली असून वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्ती आणि फटाक्यांची हि कंपनी होती. यामध्ये ६ महिला कामागारांचा मृत्यू झाला आहे.

या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिला कामगार आहेत. तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आत-बाहेर जाण्यासाठी एकच शटर असल्याने या महिला कंपनीत अडकल्या.
स्फोटाच्या आवाजाने हा शटर बंद झाले आणि आतमध्ये अडकलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यापैकी काही महिला अजूनही जखमी आहेत.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येण्यापूर्वी नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलवले होते. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या
‘आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर भारतीय डिझायनरला नेहमीच चॅम्पियन करेल’ : सोनम कपूर
बिग बॉस १७ मध्ये अंकिता लोखंडेने जिंकली अनेक सेलिब्रिटीची मन 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×