राजकियराष्ट्रीय

लोकशाहीची थट्टा करणाऱ्या मोदी व भाजपाला धडा शिकवा – मल्लिकार्जून खरगे

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करू, तरुणांच्या हाताला काम देऊ - राहुल गांधी.

Spread the love

देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहेमहागाईबेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाहीमागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत नाहीत. मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण संसदेचे अधिवेशन सुरु असताना संसदेत येण्यास वेळ नाही. संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करून कायदे पास करून घेतले ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीला न जुमनणाऱ्या मोदी व भाजपाला धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले.

काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले कीसंविधानाने महिलागरिबमागास समाजाला अधिकार दिले ते भाजपा देऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष फुलेशाहुआंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो तर मोदी आरएसएसच्या विचारधारेवर चालतात. मोदी सरकारने देशावर २०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे पण कल्याणकारी योजनांवरील निधीमध्ये कपात केली जातेमागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. भाजपाला रोखले नाही तर देश बरबाद होईलसंविधान संपुष्टात येईल.

माजी अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यावेळी म्हणाले कीकेंद्रात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे यातून मीडियानिवडणूक आयोगन्यायालयेही सुटली नाहीत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वास दिले होते पण १० वर्षात मोदींनी किती लोकांना रोजगार दिलादेशात आज ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. नोकरी नसल्याने कोट्यवधी तरुणांची शक्ती वाया जात आहे. शेतकरीतरुण संकटात आहे तर दुसरीकडे देशातील दोन-चार उद्योगपतींकडे देशातील सर्व संपत्ती सोपवली जात आहे. ओबीसीदलितमागासवर्गीयांना सत्तेतप्रशासनात अत्यंत कमी वाटा मिळत आहे. सर्वच क्षेत्रात या समाज घटकांना कमी स्थान दिले जाते. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली त्यानंतर मोदींची भाषा बदलली व देशात गरिब ही एकच जात आहे असे ते बोलत आहेत. देशातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहेहीच काँग्रेसची विचारधारा आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करेल व देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे ते मोदी सरकार दे देऊ शकत नाही ते काम काँग्रेस पक्षच करेल. आपल्या मदतीने महाराष्ट्रात व देशात परिवर्तन आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजराजर्षी शाहु महाराजमहात्मा फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा असलेल्या भूमीत काँग्रेस स्थापना दिन साजरा होत आहे याचे स्वागत आहे. महात्मा गांधी यांनी याच नागपुरातून हुकूमशाही सत्तेच्या विरोधात नारा दिला व संपूर्ण देशातून जनता एकवटली आणि १५० वर्षांची ब्रिटिशांची हुकूमशाही राजवट संपुष्टात आणली. नागपुरातून याच भूमितून इंदिराजी गांधी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा ठराव केला होता. भारताच्या मध्यवर्ती भागात ही सभा होत असून मल्लिकार्जून खरगे व राहुलजी गांधी यांचा संदेश देशात जावा यासाठी ही सभा महत्वाची आहे. हुकूमशाही सत्तेला बाहेर हाकलण्यासाठीकामगारशेतकरीतरुणांना न्याय देण्यासाठीलोकशाही व संविधान वाचवण्यासाठी है तैयार हमहा संदेश या सभेतून दिला आहे. इंदिराजी गांधी यांनी देशात हरित क्रांतीश्वेत क्रांती आणलीदेशाचा विकास केला. इंदिराजी गांधी यांनी त्यावेळी नागपुरात सभा घेतली व विदर्भातील जनतेने लोकसभेच्या ११ पैकी ११ जागा विजय मिळून दिला व इंदिराजी पंतप्रधान झाल्या. आज इंदिराजी यांचे नातू राहुलजी गांधी मोहब्बत का संदेश घेऊन आले आहेतत्यांनाही विदर्भ व महाराष्ट्राने तशीच साथ द्यावीअसे आवाहन पटोले यांनी केले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले कीस्वातंत्र्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने बलिदान दिले आहेहे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल लागला नाही तरी जनतेचा पाठिंबा मात्र वाढला आहे. देशासमोर आज मोठी संकटे उभी आहेतमहागाईबेरोजगारीशेतकऱ्यांचे प्रश्नमहिला अत्याचार या विषयावर भाजपा सरकार बोलत नाहीत. जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून धर्मांध शक्ती वेगळे मुद्दे पुढे करत आहे. काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेकांनी केलाकाँग्रेस संपली नाही पण ते लोक मात्र संपले हे लक्षात ठेवा. राज्यात समाजा-समाजात वाद उभे केले आहेतलोकांमध्ये भांडणे लावून सत्तेची पोळी भाजली जात आहे. जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणे ही काँग्रेसची भूमिका आहे पण भाजपा सरकार ते करत नाही. देशाची लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. देशाला व राज्याला मजबूत व स्थिर सरकार देण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करा.

काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभा झाली. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खरगेमाजी अध्यक्षखासदार राहुलजी गांधीअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपालमुकुल वासनिकतेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीकर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारहिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खूप्रभारी रमेश चेन्नीथल्लाकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेविधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारमाजी मुख्यमंत्री CWC सदस्य अशोक चव्हाणपृथ्वीराज चव्हाणसुशिलकुमार शिंदेविधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटीलगोवादिव व दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरेमाजी मंत्री डॉ. नितीन राऊतयशोमती ठाकूरअमित देशमुखवर्षा गायकवाडडॉ. विश्वजित कदममाजी खासदार मिलिंद देवराप्रदेश कार्याध्यक्ष नसीम खानचंद्रकांत हांडोरेबसवराज पाटीलआ. कुणाल पाटीलआ. प्रणिती शिंदेमहिला काँग्रेसच्या प्रदेशाध्या संध्या सव्वालाखेमाजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवारअल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जानागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरेनागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळकमुख्य प्रवक्ते अतुल लोंढेआमदार अभिजित वंजारीप्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरेदेवानंद पवारदेशातील काँग्रेसचे मुख्यमंत्रीप्रदेशाध्यक्षविरोधी पक्षनेतेवरिष्ठ नेतेपदाधिकारी व लाखो लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खासदार मुकुल वासनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

महत्वाच्या बातम्या
हास्याची नॉनस्टॉप पार्टी! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! ३१ डिसेंबर रोजी केवळ सोनी मराठी वाहिनीवर
शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आढावा बैठक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×