आरोग्यमहाराष्ट्र

राज्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार

बोट ॲंब्युलन्स व नवजात शिशूसांठी विशेष रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश

Spread the love

पुणे :- राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका  जीवनदायिनी ठरली आहे.   ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट ॲंब्युलन्सचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत आहेत. या पुढे १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहे.

गेल्या १० वर्षात राज्यातील करोडो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. अनेक नवजात  बालकांचा जन्म देखील रुग्णवाहिकेत झाला आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका सेवा राज्यातील नागरिकांसाठी वरदायिनी ठरली आहे. समुद्र, व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्याने ३६ बोट ॲंबुलंन्स  विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहे.  त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत.

रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने १०८ क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्ण वाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होणार आहे.  विशेषबाब म्हणजे जलदगतीने ॲंब्युलंन्स घटनास्थळी पोहोचणार आहे.दहा वर्षापुर्वी १०८ रुग्णवाहिका सुरु करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याचा सर्व भांडवली खर्च शासनाच्या वतीने करण्यात आला होता. नविन निविदेनुसार ५१ टक्के भांडवली खर्च  सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेला करावा लागणार आहे. त्यामुळे सदर निविदा १० वर्षांसाठी काढण्यात आली आहे.

१०८ रुग्णवाहिकेसाठी सद्यस्थितीत प्रती महिना ३३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे  लागत होते. रुग्णवाहिकेच्या  वाढत्या संख्येमुळे प्रती महिना ६३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागणार आहे. एकंदरीतच  अतिरिक्त ३० कोटी प्रतीमहिना शासनाला खर्च करावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या
श्रीरामांची प्रतिष्ठापना व्हावी ही कोट्यावधी भारतीयांची मनोकामना – आ. अश्विनी जगताप 
उत्साह, आवड आणि भक्तीभावाने केली जाणारी सेवा पाहून जनसामान्य प्रभावित पुण्यातून हजारो भाविक राहणार उपस्थित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×