राजकियमहाराष्ट्र

मराठा समाजाला मुंबईत यावे लागणे हेच शिंदे-भाजपा सरकारचे मोठे अपयश – नाना पटोले

आरक्षण देण्याच्या केवळ थापा, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल

Spread the love

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहेसरकारने त्यांच्याशी चर्चा केलीराणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने केवळ भुलथापा देण्यात आल्या त्यामुळेच मराठा समाजाला मुंबईत यावे लागत आहेहे शिंदे-भाजपा सरकारचे मोठे अपयश आहेअसा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

आरक्षण प्रश्नावर शिंदे-भाजपा सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले कीशिंदे-भाजपा सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधींनी अनेकदा चर्चा करुन आश्वासन दिले. सरकारचे दोन मंत्री सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात होतेपण आता हे दोन मंत्री मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना दिसत नाहीत. हे मंत्री आता चर्चा का करत नाहीतआरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होतीती मुदत संपलीत्यानंतर सरकारने दिलेली तारीखही संपली परंतु अद्याप आरक्षणाचा निर्णय काही झालेला नाही. सरकार मराठा समाजाला केवळ तारीख पे तारीख देत असून हा मराठा समाजाचा घोर अपमान आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “सत्ता आल्यास एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिम्मत फक्त फडणवीसमध्येच आहे”अशा वल्गना केली होतीएकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत कटकारस्थान करून भाजपाने सत्ता मिळवून आज दीड वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. फडणवीस यांची ती राणा भिमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेलीदेवेंद्र फडणवीस व भाजपा मराठा आरक्षणावर आत्ता गप्प कामराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनीच दिले होतेअसा प्रचार करणारे भाजपाचे पोपटही मराठा आरक्षणावर गप्प आहेत.

भारतीय जनता पक्ष हा आरक्षण विरोधी असून ते कोणत्याच समाज घटकाला आरक्षण देणार नाहीत. आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपा सरकारने राज्यातील मराठा समाज व ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप केले आहे. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणे व जातनिहाय जनगणना करणे हाच आरक्षणावरील पर्याय असून काँग्रेसने तशी मागणी आहे परंतु भाजपाचा जातनिहाय जनगणना करण्यास विरोध आहे आणि केंद्रातील मोदी सरकार आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्याचा निर्णयही घेत नाहीअसे पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
पिंपरी चिंचवड शहरात मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत
सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणा-या उदयनिधी स्टॅलिनची मते उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×