महाराष्ट्र

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारली

Spread the love

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथून लाखो मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. २६ जानेवारीला ते मुंबईत आंदोलनाला बसणार आहेत आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील आपला ताफा घेऊन लोणावळ्यात दाखल झाले आहेत, परंतु पोलिसांनी आता त्यांना नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. काळ हायकोर्टात या आंदोलनाबाबत एक सुनावणी झाली. या सुनावणीत हायकोर्टाने मुंबई पोलिसांना याबाबत आदेश दिले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने आंदोलक येणार आहेत. आझाद मैदानावर एवढी मोठी क्षमता नाही तर बाकीच्या मैदानावर अन्य नियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे मुंबईत या आंदोलनाला परवानगी दिली नाही, असं मुंबई पोलिसांनी सांगितले आहे, त्यामुळे मोर्चा पुढं न आणता खारघर येथील मैदानावर सुरु ठेवावा आणि त्या संबंधित परवानगी कार्यालयातून घ्याव्यात अशी नोटीस बजावण्यात आली आहे. काल याबाबत हायकोर्टाने सूचना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे ३३ टक्के आरक्षण लागू करणार – अलका लांबा
प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्यालयात सकाळी ८ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×