राजकियपुणे

शिवसेनेचा सोमवारी आकुर्डीत जनता दरबार अंबादास दानवे, सचिन अहिर यांची उपस्थिती

Spread the love
पिंपरी, पुणे : सामान्य शेतकरी, शेतमजूर, निराधार दिव्यांग नागरिकांच्या आणि जिल्हाधिकारी, तहसील, कृषी, महावितरण कार्यालयातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
सोमवारी (दि.५) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत, खंडोबा मंदिर सभामंडप, खंडोबा माळ, आकुर्डी येथे होणाऱ्या या जनता दरबारात पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर, मावळ संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड मावळ संपर्कप्रमुख लतिका पाष्टे, पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनिताताई तुतारे, शहर युवा अधिकारी चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख वैशाली मराठे तसेच निलेश मुटके, धनंजय आल्हाट, तुषार नवले, अनंत कोऱ्हाळे, रोमी संधू, हाजी मणियार दस्तगीर, डॉ. वैशाली कुलथे, कल्पना शेटे, तुषार नवले, मिनल यादव, रेखा दर्शिले, अमित गावडे आदींसह पक्षाचे सर्व पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, सर्व अंगीकृत संघटना, विभाग प्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
घटनाबाह्य पद्धतीने अस्तित्वात असणारे राज्य सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्या ऐवजी शासन आपल्या दारी नुसतीच बात करत आहेत. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतृत्व जनतेस साथ देणार आहे असा विश्वास नागरिकांना आहे त्यामुळे आपले प्रश्न घेऊन नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ॲड. सचिन भोसले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×