मनोरंजन

ब्लॅकला खूप प्रेम मिळत आहे हे पाहणे खूप जबरदस्त आणि अत्यंत समाधानकारक आहे-राणी मुखर्जी

Spread the love

चित्रपट ब्लॅकच्या ओटीटी रिलीजवर राणी मुखर्जी म्हणाली ,”ब्लॅकला खूप प्रेम मिळत आहे हे पाहणे खूप जबरदस्त आणि अत्यंत समाधानकारक आहे. बॉलीवूड स्टार राणी मुखर्जी OTT वर तिचा आयकॉनिक चित्रपट ब्लॅक रिलीज झाल्यानंतर प्रेमाने भारावून गेली आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी राणी मुखर्जीसोबत काम केले होते. ब्लॅकला नुकतीच 19 वर्षे पूर्ण झाली आणि तेसेलेब्रेट करण्यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केला. OTT वर लाँच झाल्यापासून, राणीला  जगभरातील चाहत्यांकडून आणि चित्रपटप्रेमीं कडून खुप छान प्रतिक्रिया मिळत आहेत।

राणी म्हणते, “ब्लॅकला 19 वर्षांनंतरही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे हे पाहणे खूप जबरदस्त आणि आनंददायी आहे. माझ्या फिल्मोग्राफीमध्ये या चित्रपटाला विशेष स्थान आहे. दिग्गज अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा आणि माझे सर्वकाळचे आवडते चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करण्याचा अनुभव माझ्यासोबत कायम राहील.”

ती पुढे म्हणते, “मला आनंद आहे की हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे आणि ज्यांनी 19 वर्षांपूर्वी  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅकची जादू पाहण्यास चुकले होते ते सर्व त्यांच्या स्क्रीनवर पाहून  त्याचे साक्षीदार होऊ शकतील. तुमचे काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचते हे पाहणे नेहमीच सुखद असते.”

महत्वाच्या बातम्या
नॅशनल क्रश रोहित सराफची राजस्थानच्या सांस्कृतिक समृद्धीची सफर 
प्रग्या कपूरने लाँच केला नवाकोरा ” ह्यूमन नेचर ” ब्रँड 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×