मनोरंजन

रोमॅंटिक महिन्यात येतोय रोमॅंटिक चित्रपट ‘एक ती’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

Spread the love

महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा १२ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून चित्रपटात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम, अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष गावडे आणि रूपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत दिसणार आहेत.

व्यक्ती आवडणं. प्रेम व्यक्त करणं. प्रेमात बेधुंद होणं. वाट्याला विरह येणं. हे सगळं या चित्रपटात पहायला मिळणार असून या सर्व भावनांना आणखी ठळक करत, मनाचा ठाव घेणारी गाणी प्रेक्षकांना हळवं करून सोडणार आहेत. कष्टाळू आणि जबाबदार युवक ते निधीच्या प्रेमात वेडा झालेल्या विनयचा वेड्यांच्या इस्पितळात जाण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात पहायला मिळणार आहे.

“प्रेमाने जग जिंकण्याएवढी ताकत असते असं म्हणतात, अशाच प्रेमातून आजच्या युवकांना आयुष्यातील एक प्रेरणादायी धडा शिकवणारा चित्रपट ‘एक ती’ प्रदर्शित करताना मन हर्षित होत आहे. अशा प्रकारचे दर्जेदार चित्रपट अल्ट्रा झकासवर संकलित करण्याचा आमचा कायम प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
विद्यार्थ्यांनी केला वाहतूक नियम पालनाचा निर्धार
महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विहान शर्माची निवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×