पुणे

जोतिचंद भाईचंद ज्वेलर्सतर्फे ‘महा उत्सव’चा शुभारंभ: कृतज्ञता आणि पारितोषिकांनी भरगच्च नेत्रदीपक रजनी

Spread the love

पुणे:- ज्वेलरी उद्योगातील एक प्रतिष्ठित नाव असलेल्या जोतिचंद भाईचंद ज्वेलर्सने नुकतेच त्यांच्या मूल्यवान ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “महा उत्सव” या नेत्रदीपक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  सहा पिढ्यांचा वारसा असलेल्या, जोतिचंद भाईचंद ज्वेलर्सने उत्कृष्ट दागिने तयार करण्यात सातत्याने आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, जे विश्वास आणि पारदर्शकतेचे समानार्थी बनले आहे.

हडपसर येथील प्रख्यात टेरिट्री हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम ग्राहकांची निष्ठा आणि त्‍यांच्या समर्थनाचा भव्य उत्सव होता.  जोतिचंद भाईचंद ज्वेलर्सचे दूरदर्शी नेते श्री. स्वप्नील श्रेणिककुमार शहा आणि सौ. मुकुलिका स्वप्नील शहा आणि श्री. औषुमालिन स्वप्नील शहा यांच्या नेतृत्वाखाली, उत्साह आणि अपेक्षेने भरलेली अशी एक अविस्मरणीय संध्याकाळ आयोजित केली होती.

“महा उत्सव” दरम्यान, जोतिचंद भाईचंद ज्वेलर्सने, प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे, आश्चर्यकारक भेटवस्तू प्रदान करून ग्राहकांच्या समाधानाप्रत त्यांच्या असलेल्या बांधिलकीचे दर्शन घडविले.  निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने करण्यात आलेल्या विजेत्यांच्या निवडीवरून, कंपनीचे, प्रामाणिकपणा आणि निष्पक्षतेप्रती असलेले समर्पण प्रतिबिंबित झाले.

बंपर बक्षिसांची घोषणा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते:

प्रथम पारितोषिक विजेत्याला, प्रगती, गतिशीलता आणि जीवनाच्या प्रवासात नेव्हिगेट करण्याच्या क्षमतेचे प्रतीक अशी, एक आलिशान टाटा अल्ट्रोझ कार देण्यात आली.

दुसऱ्या पारितोषिक विजेत्यांना, स्टाईलिश आणि सोयीस्कर वाहतूक पद्धती प्रदान करणार्‍या, दोन Activa 6 G बाईक प्रदान करण्यात आल्या.

तिसऱ्या पारितोषिक विजेत्‍यांना, प्रत्येकी 1 किलोच्या 3 अद्वितीय चांदीच्या पट्ट्या, प्रदान करण्यात आल्या.

निवडीसाठी आयोजित, प्रश्नमंजुषा स्पर्धेने सर्व सहभागींकरीता समान संधी सुनिश्चित होती आणि यामध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येकासाठी हा एक निःपक्ष आणि रोमांचक अनुभव ठरला.

हडपसरमधील टेरिट्री हॉटेल, या भव्य सोहळ्यासाठी योग्य ठिकाण ठरले, ज्यामुळे उपस्थितांसाठी एक अत्याधुनिक आणि स्वागतार्ह वातावरण उपलब्ध झाले.  उपस्थितांनी, मनोरंजन आणि सौहार्दाबरोबरच, सहग्राहकांना पारितोषिके पटकावताना पाहात, संस्मरणीय संध्याकाळचा आनंद लुटला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×