पुणेसामाजिक

पिनाकल इंडस्‍ट्रीज आणि ग्रुप कंपन्‍यांकडून पुण्‍यामध्‍ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

Spread the love

पुणे:– पिनाकल इंडस्‍ट्रीज आणि त्‍यांच्‍या ग्रुप कंपन्‍यांनी २१ मार्च रोजी जागतिक वन दिनानिमित्त पुण्‍यामध्‍ये सर्वसमावेशक वृक्षारोपण मोहिम सुरू केली. हा उपक्रम सोमाटणे फाटापुणे जवळ १,००० झाडांची लागवडदेखरेख व जतन करण्‍यावर लक्ष केंद्रित करेलज्‍यामधून पिनाकल इंडस्‍ट्रीज आणि त्‍यांच्‍या सहयोगी कंपन्‍यांची पर्यावरण शाश्‍वतता व संवर्धनाप्रती सहयोगात्‍मक कटिबद्धता दिसून येते.

२१ मार्च २०२४ रोजी सुरू करण्‍यात आलेली वृक्षारोपण मोहिम जगभरात साजरा केल्‍या जाणा-या जागतिक वन दिनाशी संलग्‍न आहेज्‍यामधून पृथ्‍वीवरील जीवन अस्तित्त्‍वात राहण्‍यासाठी वन व झाडांचे संवर्धन करण्‍याचे महत्त्व दिसून येते. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून पिनाकल इंडस्‍ट्रीज ग्रुपचा पुण्‍यातील हरित निसर्गाचे संवर्धन करण्‍याप्रतीजैवविविधतेला चालना देण्‍याप्रती आणि हवामान बदलाचे निराकरण करण्‍याप्रती योगदान देण्‍याचा मनसुबा आहे. कंपनी कार्यरत असलेल्‍या सर्व ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धन मोहिमांचे आयोजन करेल. हा उपक्रम भारत सरकारच्‍या नॅशनल क्‍लीन एअर प्रोग्रामशीतसेच यूएनच्‍या सस्‍टेनेबिलिटी डेव्‍हलपमेंट गोल्‍सशी संलग्‍न आहे.

आम्‍हाला जागतिक वन दिनानिमित्त पुण्‍यामध्‍ये व्‍यापक वृक्षारोपण मोहिम लाँच करण्‍याचा आनंद होत आहे,” असे पिनाकल इंडस्‍ट्रीजचे अध्‍यक्ष श्री. अरिहंत मेहता म्‍हणाले. आम्‍हाला पर्यावरणीय संतुलन राखण्‍यामध्‍ये आणि भावी पिढ्यांसाठी शाश्‍वत भविष्‍याची खात्री घेण्‍यामध्‍ये जंगल व झाडे बजावत असलेल्‍या बहुमूल्‍य भूमिकेबाबत माहित आहे. आमच्‍या एकत्रित प्रयत्‍नांच्‍या माध्‍यमातून आमची समुदायांसाठी हरितआरोग्‍यदायी वातावरण निर्माण करण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. तसेचआमच्‍या सर्व ग्रुप कंपन्‍याकर्मचारी व सहयोगींसाठी एकत्र येऊन या थोर कार्याप्रती योगदान देण्‍याची ही उत्तम संधी आहे. आम्‍ही आशा करतो की, ही व्‍यापक वृक्षारोपण मोहिम प्रदूषण कमी करण्‍याप्रतीस्‍थानिक परिसंस्‍था व जैवविविधता सुधारण्‍याप्रती योगदान देईल.

वृक्षारोपण उपक्रम स्‍थानिक प्राधिकरणांसोबत सहयोगाने आयोजित करण्‍यात येतीलज्‍यामध्‍ये कंपनीचे कर्मचारीसमुदायातील स्‍वयंसेवक यांचा सक्रिय सहभाग असेल. यामधून सहयोगात्‍मक कृती व एकत्रित जबाबदारीचा उत्‍साह दिसून येईल. स्‍थानिक हवामान व परिसंस्‍थेमध्‍ये टिकून राहण्‍यासाठी काळजीपूर्वक निवडण्‍यात आलेल्‍या स्‍वदेशी झाडांच्‍या प्रजातींची लागवड करण्‍यात येईलज्‍यामुळे जैवविविधता वाढेल आणि परिसंस्‍थेमध्‍ये स्थिरता निर्माण होईल.

वृक्षारोपणाव्‍यतिरिक्‍त पिनाकल इंडस्‍ट्रीज आणि तिच्‍या ग्रुप कंपन्‍या लागवड करण्‍यात आलेल्‍या झाडांची दीर्घकाळापर्यंत देखरेख व काळजी घेण्‍याप्रतीतसेच झाडांना नियमितपणे पाणी देणेरोपांची छाटणीकीटक व रोगांपासून संरक्षण याप्रती कटिबद्ध आहेत.

आमचा विश्‍वास आहे की लागवड करण्‍यात आलेला प्रत्‍येक वृक्ष उज्‍ज्‍वलहरित भविष्‍याच्‍या दिशेने महत्त्‍वपूर्णपाऊल आहे,” असे श्री. अरिहंत मेहता म्‍हणाले. जागतिक वन दिनानिमित्त आपल्‍या नैसर्गिक वारसाचे जतन व संवर्धन करण्‍याचे वचन घेऊया. सहयोगानेआपण हवामान बदल व पर्यावरणाच्‍या ऱ्हासाच्‍या विरोधातील लढ्यामध्‍ये अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणू शकतो.

पिनाकल इंडस्‍ट्रीज आणि तिच्‍या ग्रुप कंपन्‍या मीडिया सदस्‍यस्‍थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींना या महत्त्वपूर्ण वृक्षारोपण मोहिमेमध्‍ये सामील होण्‍याचे आणि निसर्गामधील वन व परिसंस्‍थांचे संरक्षण करण्‍याच्‍या सहयोगात्‍मक प्रयत्‍नाप्रती योगदान देण्‍याचे आवाहन करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×