व्यापारपुणे

सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर’च्या शुभ हस्ते पुणे येथे शॉपर्स स्टॉपच्या 6 व्या दालनाचे उदघाटन

Spread the love

पुणे:- भारतातील सर्वोच्च दर्जाचे फॅशन, सौंदर्य आणि भेटवस्तूशी निगडीत ओमनीचेन डेस्टीनेशन, शॉपर्स स्टॉप, पुण्यात फॅशनप्रेमींसाठी घेऊन आले आहे; आनंदित होण्याचे आणखी एक कारण! या ब्रॅंडच्या वतीने एका चैतन्यमय शहरात आपले नवीन दुकान सुरू केले आहे. लोकप्रिय अभिनेत्री स्टाइलबाज सई ताम्हणकर हिच्या शुभहस्ते या दालनाचे  उदघाटन करण्यात आले. पुण्यातील ट्रिबेका हायस्ट्रीट येथे असलेल्या या दालनात आपल्या ग्राहकांना खरेदीचा सर्वोत्तम अनुभव आणि प्रीमियम राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ब्रँडचे भरपूर पर्याय उपलब्ध असतील. ज्यामुळे शहरातील चोखंदळ खरेदीदारांसाठी हे अल्टीमेट गो-टू डेस्टीनेशन बनेल.

पुण्यातील या 6 व्या शॉपर्स स्टॉपच्या समावेशामुळे, एक आनंददायी खरेदीचा अनुभव खरेदीदारांच्या नजीक उपलब्ध झाला आहे. जवळपास 500 हून अधिक ब्रँड, नवीन फॅशन ट्रेंड, वर्धित सौंदर्य अनुभव, विविध प्रकारच्या घड्याळे, बॅग, सनग्लासेस, सुगंध, भेटवस्तू पर्याय आणि बरेच काही, सर्व सोयीस्करपणे एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने सर्व प्रसंगी सर्वात ट्रेंडी लुक तयार होऊ शकतो.

खरेदीचा एक अनुभव आनंददायी करण्यावर शॉपर्स स्टॉपचा कायमच विश्वास आहे आणि हे दुकान म्हणजे वचनबद्धतेचा पुरावा म्हणता येईल. या नवीन दालनामुळे खरेदी अनुभवात भर पडेल, सौंदर्यपूर्ण कायापालट म्हणजेच मेकओव्हर आणि पर्सनल शॉपर सेवा उपलब्ध होतील. याव्यतिरिक्त, प्रसिद्ध शॉपर्स स्टॉप फर्स्ट सिटिझन्स क्लब प्रोग्राम आपल्या निष्ठावंत ग्राहकांना खरेदीचा एक फायदेशीर अनुभव देण्याचे आश्वासन देतो. प्रीमियम ब्लॅक कार्ड मेंबरशिप प्रोग्राम खरेदीदारांना विशेषाधिकार, अद्वितीय कार्यक्रम आमंत्रणे, वर्षभराचे परतावा धोरण, भरपूर सवलतीची सुविधा आणि इतर अनेक रिवॉर्डचा आनंद घेण्यास अनुमती देतो.

शॉपर्स स्टॉप लिमिटेड’चे कस्टमर केअर असोसिएटएक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आणि सीईओ कवींद्र मिश्रा म्हणाले, “आम्ही आमच्या रिटेल फूटप्रिंटचा विस्तार करत असताना, प्रीमियम उत्पादने आणि सेवांद्वारे ग्राहकांचा अनुभव उंचावण्यासाठी समर्पित आहोत. आमच्या ग्राहकांसाठी खरेदीचा अतुलनीय अनुभव निर्माण करण्याच्या वचनबद्धतेमुळे प्रेरित आहोत आणि पुण्यातील ग्राहकांच्या फॅशनच्या गरजा पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नवीनतम ट्रेंडचा शोध घेणे किंवा पर्सनल स्टाईलिंग वृद्धिंगत करणे असो, आम्हाला विश्वास वाटतो की आमच्या दालनाला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक लक्षवेधी अनुभव ठरेल. दालनाच्या  उदघाटन सोहळ्याला सई उपस्थित राहिली त्याकरिता तिचे अनेक आभार! तिने आमच्यासाठी आवर्जून वेळ काढला आणि याप्रसंगी लाभलेली तिची हजेरी उत्साहवर्धक ठरली”.

लॉन्चिंगच्या वेळी बोलताना सई ताम्हणकर म्हणाली, “शॉपर्स स्टॉप हा नेहमीच माझा आवडता ब्रँड राहिला आहे. मी स्वत: या ब्रँडच्या सोबतीने वाढलेली आहे आणि आज पुण्यात शॉपर्स स्टॉपच्या नवीन स्टोअरच्या उदघाटनाचा एक भाग असल्याने मला प्रचंड आनंद आणि उत्साह वाटतो आहे. हे नाव केवळ फॅशनबद्दल नाही, तर प्रत्येकाकरिता स्वागतार्ह, प्रेरणा देणारे आणि फॅशनच्या स्वरुपात स्वतःची अभिव्यक्ती शोधण्याची संधी देणारे आहे. या दालनात आश्चर्यकारक ब्रँड आणि शहरातील अशी 6 दालने असल्याने, पुण्यातील फॅशन उत्साही आणि ट्रेंडसेटरकरिता एक पसंतीचे खरेदी ठिकाण बनले आहे”.

ट्रिबेका हायस्ट्रीट पुणे येथील नवीन शॉपर्स स्टॉप स्टोअरमध्ये उच्च दर्जाच्या ब्रँडसह तुमची शैली एक पाऊल पुढे राहते, शहरातील फॅशन दृश्य नव्याने परिभाषित करण्यासाठी शॉपर्स स्टॉप सज्ज आहे. या स्टोअरमध्ये रेअर रॅबिट, सेलिओ, अमेरिकन ईगल, काझो, वेरो मोडा, कव्हर स्टोरी, अँड, ओन्ली, लेव्हीज, यूसीबी, जॅक अँड जोन्स, लॉरियल, मिनिमलिस्ट, कामा आयुर्वेद यासारखी प्रसिद्ध फॅशन आणि सौंदर्य लेबल आहेत जी तुम्हाला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी साजेशी आहेत. या व्यतिरिक्त, तुमच्या स्टाइल स्टेटमेंटला साजेसे गेस, फॉसिल, अरमानी एक्सचेंज, टॉमी हिलफिगर, केनेथ कोल आणि इतर प्रीमियम घड्याळ ब्रँडची विस्तृत श्रेणी आहे. गेस, पोलिस, कॅल्विन क्लेन, एफ. सीयूके, एस्प्रिट आणि इतर अनेक सनग्लासेस सुट्टीसाठी अगदी योग्य आहेत. इतकेच नाही तर या दालनात टुमी, वायएसएल, प्रादा, अरमानी, व्हॅलेंटिनो इसी मियाक यासारख्या लक्झरी फ्रेगरन्स ब्रँडची एक आश्चर्यकारक श्रेणी देखील उपलब्ध आहे, जी कायमस्वरूपी छाप सोडेल. लहान वयाच्या फॅशनिस्टांसाठी कॅरट, वेरो मोडा गर्ल, यूसीबी किड्स, टायनी गर्ल, पेपरमिंट हे ब्रॅंड नक्की पाहून घ्या.

शॉपर्स स्टॉप’ने आपल्या नवीन आउटलेटच्या उद्घाटनासह ग्राहकांना अपवादात्मक अनुभव देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी दिली आहे. तर मग, खरेदी करण्यासाठी पुण्यातील ट्रिबेका हायस्ट्रीटमधील अगदी नवीन शॉपर्स स्टॉपला भेट द्या!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×