क्रीडापुणे

नायट्रो फिटनेसद्वारे नायट्रोथॉन २०२४चे यश साजरेः शिक्षणाद्वारे मुलींचे सक्षमीकरण

Spread the love

पुणे:- कल्याणी नगर येथे आयोजित केलेल्या नायट्रोथॉन 2024 च्या शानदार यशाची नायट्रो फिटनेसने आनंदात घोषणा केली. शिक्षणाच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी समर्पित, हा कार्यक्रम, समाजावर अपेक्षेपलिकडे प्रभाव टाकणारा झाला.

नायट्रोथॉन 2024 या कार्यक्रमाने, या विशाल कार्यासाठी, सर्व स्तरातील व्यक्तींना एकत्र आणले.  वंचित मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, विविध फिटनेस स्तरावरील धावपटू, 3km, 5km आणि 10km शर्यतीच्या गटांमध्ये सामील झाले होते.  सकारात्‍मक उपक्रमासाठी आपला हातभार लागतो आहे या विचाराने, अंतिम रेषा ओलांडताना धावपटू, भारून जात होते.

मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांच्यासह सुनील टिंगरे आणि श्रीमती चाहत दलाल यांनी, शिक्षणाद्वारे मुलींच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी, या कार्यक्रमाला पाठिंबा दिला.  सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सामुहिक कृतीचे महत्त्व, त्यांच्या प्रेरणादायी शब्दांमुळे सहभागी धावपटू आणि प्रेक्षक यांच्या मनावर ठसले.

नायट्रो फिटनेसचे सिएमडी आणि संस्थापक प्रबोध डावखरे याप्रसंगी बोलताना म्हणाले, नायट्रो फिटनेस नायट्रोथॉन २०२४ मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे.  शिक्षणाच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी तुमची वचनबद्धता आणि समर्पण भावना यामुळे हा कार्यक्रम अतुलनीय यशस्वी झाला आहे.  एकत्रितपणेपण सर्वांकरीता उज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करत आहोत.”

अंतिम रेषेच्या पलीकडे नायट्रोथॉनचा प्रभाव विस्तारला आहे.  या कार्यक्रमातून जमा होणारा निधी थेट वंचित मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांनी यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि संधी प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरेल.  शिक्षणामध्ये गुंतवणूक करून, Nitro Fitness आणि त्‍यांचे समर्थक, वाटेत येणारे अडथळे दूर सारीत, अधिकाधिक न्याय्य समाजासाठी मार्ग निर्माण करीत आहेत.

जल्लोष ओसरला आणि घाम सुकला तरी नायट्रोथॉनचा उत्‍साह कायम राहिला आहे.  समाजामध्ये आरोग्य, निरोगीपणा आणि सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या ध्येयासाठी नायट्रो फिटनेस वचनबद्ध आहे.  प्रत्येक मुलीला तिची क्षमता पूर्णपणे वापरण्याची संधी मिळेल असे जग निर्माण करण्यासाठी आपण एकत्रितपणे, प्रयत्न करत राहू.

नायट्रोथॉन 2024 मधील क्षणचित्रे आणि भविष्यातील कार्यक्रमांबद्दल माहितीसाठी, कृपया www.nitrrofitness.com ला भेट द्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×